Mahabreaking

[breaking_news]

Truck-Trailer Collision :टायर बदलत असताना ट्रकची धडक, युवकाचा जागीच मृत्यू

Truck-Trailer Collision : टायर बदलत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २४मे ) रोजी पहाटे अकोला-मुर्तिजापूर मार्गावरील अनभोरा गावाजवळ घडली. टायर पंचर झालेल्या वाहनाची स्टेपनी बसवून नट कासत असताना भरधाव वेगातील अज्ञात ट्रक-टेलरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Truck-Trailer Collision

टायर पंचर ठरला जीवघेणा; अनभोरा जवळ भीषण अपघात; चालक फरार, गुन्हा दाखल

संजय तायडे

बोरगाव मंजू : टायर बदलत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २४मे ) रोजी पहाटे अकोला-मुर्तिजापूर मार्गावरील अनभोरा गावाजवळ घडली. टायर पंचर झालेल्या वाहनाची स्टेपनी बसवून नट कासत असताना भरधाव वेगातील अज्ञात ट्रक-टेलरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक पवन दिपक वानखडे (वय २७, रा. सिद्धार्थ नगर, बोरगावमंजू, ता. जि. अकोला) हा त्याचा सहकारी रोहित गोटमारे यांच्यासह सरगम बँड पार्टी, अकोला यांच्या वाहनाने कारंजा येथून मुर्तिजापूरमार्गे बोरगावमंजूकडे परतत होता. दरम्यान, पहाटे सुमारे १.०५ वाजताच्या सुमारास ग्राम अनभोरा परिसरात वाहनाचा टायर पंचर झाला.टायर पंचर झाल्यानंतर पवन वानखडे व त्याचे सहकारी वाहनाची स्टेपनी बसवून टायरचे नट कासत असताना मुर्तिजापूरकडून येणाऱ्या अज्ञात ट्रक-टेलर चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पवन वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित गोटमारे (रा. बोरगावमंजू), तौफीक शाह व सतीश वानखडे (रा. अकोला) हे तिघे जखमी झाले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मृत्यूची वार्ता समजताच बोरगावमंजू परिसरात शोककळा पसरली.

या प्रकरणी मृतकाचा भाऊ प्रविण दिपक वानखडे (वय ३२, व्यवसाय चालक, रा. सिद्धार्थ नगर, बोरगावमंजू) यांच्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक-टेलर चालकाविरुद्ध अपक्र. २३१/२०२६ अन्वये कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ तसेच सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एनपीसी दिनेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्याची नोंद महिला सहायक उपनिरीक्षक शकुंतला सदार यांनी केली आहे. फरार ट्रक-टेलर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top