Mahabreaking

[breaking_news]

Prakash Avchar :काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी प्रकाश अवचार यांची वर्णी

Prakash Avchar : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश अवचार (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होम टाऊन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

Prakash Avchar

राहुल बोंद्रे युगानंतर प्रकाश अवचार यांच्याकडे नेतृत्व; बुलढाण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश अवचार (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होम टाऊन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नेतृत्व बदलाची चर्चा रंगली होती. दरम्यान, इतर पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले संदीप शेळके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यांनी जिल्ह्यात दौरे करून संघटनात्मक हालचालींनाही वेग दिल्याने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकते, अशी राजकीय शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अखेर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश अवचार (पाटील) यांच्यावर विश्वास दाखवत संघटन नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली.

राजकीय दृष्टिकोनातून पाहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, ग्रामीण भागात पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, ही मोठी जबाबदारी आता प्रकाश अवचार यांच्यासमोर असणार आहे.

सध्या जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय ताकद मर्यादित असल्याचे चित्र आहे. विधान परिषदेतील धीरज लिंगाडे यांचा अपवाद वगळता पक्षाकडे प्रभावी लोकप्रतिनिधित्व कमी असल्याने संघटन पुनर्बांधणीचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. घाटावर व घाटाखाली पुन्हा पक्षाचे गतवैभव निर्माण करायचे असेल, तर बूथस्तरापासून कार्यकर्त्यांना सक्रिय करत सातत्यपूर्ण जनसंपर्कावर भर द्यावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top