Mahabreaking

[breaking_news]

Forest Department Launches Crackdown :मेहकर वनपरिक्षेत्रात वन विभागाचा धडाका; १०० घनमीटर अवैध लाकूड जप्त, तस्करांमध्ये खळबळ

Forest Department Launches Crackdown : अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने धडक मोहीम हाती घेत मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मेहकर, लोणार आणि सुलतानपूर परिसरात धाडी टाकून सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध वन कायद्यान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Forest Department Launches Crackdown

अवैध वृक्षतोडीवर वन विभागाचा मोठा प्रहार; मेहकर-लोणार-सुलतानपूरमध्ये धाडसत्र

 मेहकर :  अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने धडक मोहीम हाती घेत मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मेहकर, लोणार आणि सुलतानपूर परिसरात धाडी टाकून सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध वन कायद्यान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड करून लाकडाची बेकायदेशीर साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एम. काकडे यांच्या नियोजनानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही धडक कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान लोणार आणि सुलतानपूरसह विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. कारवाईत विनापरवाना व बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले लाकूड जप्त करण्यात आले असून संबंधित प्रकरणांमध्ये वन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संशयितांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण रॅकेटचा उलगडा करण्यासाठी वन विभागाने तपास वेगाने सुरू केला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. सातपुते यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. “प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी विनापरवाना वृक्षतोड करू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

या कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली असून वन विभागाच्या पथकात वनपाल व्ही. एम. फुके, वनरक्षक कैलास चौधरी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top