Mahabreaking

[breaking_news]

Married Woman Demanded Sexual Favors :संतापजनक, शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी विवाहितेला केली शरीरसुखाची मागणी

Married Woman Demanded Sexual Favors : शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या विवाहित महिलेकडे लिपिकाने शरीरसुखाची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षणाच्या मंदिराची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आल्याने बाळापूर शहरात संताप व्यक्त होत आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून या आरोपी लिपीकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

balapur

बाळापुरातील प्रतिष्ठीत शाळेच्या लिपीकाचा प्रताप ; पोलिसांनी गुन्हा दाखल करून केली अटक

 बाळापूर : शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत टी.सी. (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या विवाहित महिलेकडे लिपिकाने शरीरसुखाची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षणाच्या मंदिराची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आल्याने बाळापूर शहरात संताप व्यक्त होत आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून या आरोपी लिपीकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय विवाहित महिला आपल्या मुलीच्या शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी संबंधित शाळेत गेली होती. यावेळी शाळेतील क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने महिलेला यापूर्वीही त्रास दिल्याचा तसेच स्वतःच्या चारचाकी वाहनातून लिफ्ट देताना कथितरीत्या शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने तातडीने बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मनिष जगन्नाथ शर्मा याच्या विरोधात विनयभंगासंदर्भातील कलम ७४ व ७५ (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली पाटील करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top