Mahabreaking

[breaking_news]

Youth Consumes Poison :डोणगावात खळबळ! तरुणाने डोणगाव पोलीस स्टेशनसमोरच केले विष प्राशन  

Youth Consumes Poison : कौटुंबिक वादात पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका तरुणाने डोणगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ विष प्राशन केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Youth Consumes Poison

 डोणगाव : कौटुंबिक वादात पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका तरुणाने डोणगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ विष प्राशन केल्याची घटना १९ मे रोजी सकाळी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव येथील साजनशहा अब्दुल शहा या तरुणाने कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे हे कारवाई करीत नसल्याचा आरोप करत सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान डोणगाव पोलीस स्टेशनच्या दरवाजातच कथितरित्या विष प्राशन केले.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत संबंधित तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला मेहकर येथील रुग्णालयात हलविल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे डोणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित तरुणाने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची कोणतीही अधिकृत नोंद घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाची पुढील माहिती आणि पोलीस तपासानंतर अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

“सदर साजनशहा यांचा पत्नीबरोबर कौटुंबिक वाद होता. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीच्या कुटुंबातील व्यक्तींविरुद्ध कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप करीत साजनशहा यांनी रोष व्यक्त केला. कारवाई का होत नाही, हा राग मनात धरून त्यांनी विष प्राशन केले,” असे डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top