Mahabreaking

[breaking_news]

Grand Shivpuran Discourse :अधिक मासानिमित्त भव्य शिवपुराण कथा, पारायण व किर्तन सोहळा

Grand Shivpuran Discourse : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात अधिक मासानिमित्त भव्य शिवपुराण कथा, पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा २१ मे ते २८ मे दरम्यान पार पडणार असून, भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.

Grand Shivpuran Discourse

 २१ ते २८ मे दरम्यान साखरखेर्ड्यात आयोजन

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात अधिक मासानिमित्त भव्य शिवपुराण कथा, पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा २१ मे ते २८ मे दरम्यान पार पडणार असून, भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.

अधिक मासाला पुरुषोत्तम मास तसेच मलमास असेही संबोधले जाते. परमार्थ साधनेसाठी हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात पूजा, अर्चना, जप-ध्यान, पारायण आणि विविध प्रकारच्या आध्यात्मिक साधनांना विशेष महत्त्व असते. या महिन्यात केलेले सत्कर्म अनेक जन्मांचे पुण्य प्राप्त करून देणारे मानले जाते. नामस्मरण व दानधर्माद्वारे परमेश्वराची कृपा लवकर प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

“अधिक मास अधिकस्य अधिकम् फलम्” या उक्तीप्रमाणे, पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराद्वारे केलेले सत्कर्म हे भगवंतप्राप्तीचे साधन ठरते. प्रापंचिक जीवनात आनंदाचा शोध घेणाऱ्या जीवाला परमात्मभक्तीतूनच खरे कल्याण प्राप्त होते. याच उद्देशाने श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुपुष्पामृत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहात पहाटे ६ ते ७ : संत शिवदासकृत शिवपाठ, सकाळी ७ ते ८ : श्रींच्या समाधीस्थळी रुद्राभिषेक, सकाळी ९ ते ११ : परमरहस्य पारायण, सकाळी ११ ते १२ : व्याख्यान, दुपारी १२ ते २ : महाप्रसाद, दुपारी २ ते ५ : प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री, आळंदी यांचे शिवपुराण कथानिरूपण, सायंकाळी ५ ते ६ : संत लक्ष्मण महाराजकृत शिवपाठ, सायंकाळी ६ ते ८ : महाप्रसाद, रात्री ८.३० ते ११ : किर्तन सेवा असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top