Mahabreaking

[breaking_news]

Pursuing Education :आई-वडिलांसोबत बिबे फोडत शिक्षणाचा ध्यास; सोमनाथचे दहावीत घवघवीत यश

Pursuing Education :प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आई-वडिलांसोबत वर्षभर बिबे फोडून गोडंबी काढण्याचे काम आणि शेतमजुरी करत शिक्षण पूर्ण करणाऱ्या सोमनाथ महादेव मागाडे याने दहावीच्या परीक्षेत ८१.४० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

 

मजुरी करत आश्रमशाळेतून शिक्षण; आदिवासी विद्यार्थ्याची ८१.४० टक्क्यांनी चमकदार कामगिरी

 बबन इंगळे

सायखेड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आई-वडिलांसोबत वर्षभर बिबे फोडून गोडंबी काढण्याचे काम आणि शेतमजुरी करत शिक्षण पूर्ण करणाऱ्या सोमनाथ महादेव मागाडे याने दहावीच्या परीक्षेत ८१.४० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

सोमनाथ हा सायखेड येथील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी असून त्याचे वडील महादेव मागाडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही सोमनाथने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली.

सुट्टीच्या दिवशी तो आई-वडिलांसोबत बिबे फोडून गोडंबी काढण्याचे काम करत होता. याशिवाय शेतात मजुरीही करत कुटुंबाला हातभार लावत होता. असे असतानाही त्याने अभ्यासात सातत्य ठेवून कोणत्याही खासगी शिकवणी वर्गाचा आधार न घेता हे यश मिळवले.

अभ्यासात हुशार असलेल्या सोमनाथने घरून ये-जा करण्याऐवजी छावणी धाबा येथील बाबासाहेब धाबेकर आश्रम शाळेत प्रवेश घेतला. आश्रम शाळेत राहून त्याने नियमित व मन लावून अभ्यास केला. त्याच्या मेहनतीचे फलित म्हणून दहावीच्या परीक्षेत त्याने ८१.४० टक्के गुण मिळवले.

सोमनाथच्या या यशाबद्दल आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची जिद्द आणि मेहनत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top