Mahabreaking

[breaking_news]

Misconduct with College Student :महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, परिसरात संताप

Misconduct with College Student :बाळापूर-अकोला मार्गावरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पारस येथील प्रेम सावदेकर याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Misconduct with College Student

 बाळापूर : बाळापूर-अकोला मार्गावरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पारस येथील प्रेम सावदेकर याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी महाविद्यालय परिसरात ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनीने घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. फिर्यादीनुसार, आरोपीने विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्या पाठीवर मारले. त्यामुळे ती खाली पडल्यावर आरोपीने तिच्या पाठीवर हात फिरविल्याने तिला लज्जा उत्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडितेच्या आईने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या आधारे आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शैक्षणिक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालय परिसरात अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top