Mahabreaking

[breaking_news]

Celebrating Birthday with a Sword :हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणे पडले महागात; युवकावर गुन्हा  

Celebrating Birthday with a Sword : वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन हवेत फिरवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले.  नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी या युवकाविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी विविध् कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Celebrating Birthday with a Sword

मोताळा : वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन हवेत फिरवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले.  नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी या युवकाविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी विविध् कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन खाँ पिर खाँ (वय ३७, रा. वार्ड क्रमांक १०, आठवडी बाजाराजवळ, मोताळा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन बोराखेडी येथे अपराध क्रमांक २५२/२०२६ अन्वये कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम तसेच कलम ३७ (१), (३) महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १० मे २०२६ रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीने वाढदिवसाच्या निमित्ताने हातात धारदार तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी ती हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच दि. १२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता आरोपी हा त्याच्या राहत्या घरी तलवार बाळगताना आढळून आला.या प्रकारामुळे जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण रामदास पडोळ यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top