Mahabreaking

[breaking_news]

Truck Goes Missing :नाफेड खरेदी केंद्रातील 15 लाखांचा हरभरा गायब; ट्रकच बेपत्ता, चालकावर संशय

Truck Goes Missing : शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांच्या हरभऱ्याचा ट्रक मलकापुरला पोहचलाच नाही. ही घटना 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली.  या प्रकरणी ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात येत असून संबंधितांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Truck Goes Missing

270 क्विंटल हरभऱ्याचा अपहार? लालमाती येथून निघालेला ट्रक मलकापूरला पोहोचलाच नाही

मोताळा : शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तब्बल 15 लाख 86 हजार रुपयांच्या हरभऱ्याचा ट्रक मलकापुरला पोहचलाच नाही. ही घटना 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली.  या प्रकरणी ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात येत असून संबंधितांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, थळ ता. मोताळा येथील शेतकरी तथा संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे नाफेड खरेदी केंद्र अध्यक्ष राजेंद्र आनंदराव जगले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. लालमाती किन्होळा येथील गोदामात परिसरातील शेतकऱ्यांकडून शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदी करून साठवण्यात आला होता. हा माल पुढे मलकापूर येथील शासकीय वखार महामंडळात पाठविण्यात येतो.

दरम्यान, परिसरातील 12 शेतकऱ्यांचा एकूण 270 क्विंटल हरभरा, म्हणजेच 50 किलो वजनाच्या 540 कट्ट्यांचा माल, सरकारी हमीभावानुसार 15 लाख 86 हजार 250 रुपये किमतीचा ट्रक क्रमांक MH 43-U-5290 मध्ये भरून 9 मे रोजी चालक शेख आमीन शेख जमील याच्यासोबत मलकापूरकडे रवाना करण्यात आला होता.

10 मे रोजी सुट्टी असल्याने माल पोहोचल्याची खात्री करण्यात आली नव्हती. मात्र 11 मे रोजी सकाळी लकी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाचा फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चालकाने ट्रक मोताळा येथील महाराष्ट्र आयओ समोर उभी केल्याचे सांगितले, मात्र तेथे ट्रक अथवा हरभऱ्याचा माल आढळून आला नाही.यानंतर संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे कर्मचारी तसेच ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मलकापूर रोड टोल नाका परिसरात शोध घेतला. मात्र ट्रक आणि मालाचा कोणताही मागमूस लागला नाही.तक्रारदार राजेंद्र जगले यांनी चालकाने माल मलकापूरच्या शासकीय वखारीत न नेता अन्यत्र नेऊन अपहार केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रक व मालाचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली असून हमीभाव योजनेतील मालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, ट्रकचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top