Mahabreaking

[breaking_news]

  Two individuals commit suicide: बार्शीटाकळीत एकाच दोरीला दोघांनी घेतला गळफास; व्हॉट्सअॅसप सुसाईड नोटमुळे खळबळ

Two individuals commit suicide: तालुक्यातील महान धरण परिसरातील जंगलात एकाच दोरीला गळफास घेतलेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्येची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले, तरी पोस्टमार्टम अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.  किशोर बळीराम सोनटक्के (वय ४०, रा. कानडी ता. मुर्तिजापूर जि. अकोला) आणि किशोर मारोती बोडखे (वय ६०, रा. वरुड ता. मंगरूळपीर जि. वाशिम) अशी मृतकांची नावे आहेत.

  Two individuals commit suicide

 महान धरणाजवळील जंगलात दुहेरी आत्महत्येचे गूढ; कॉल रेकॉर्ड, मोबाईल डेटा तपासणीला

बबन इंगळे

बार्शीटाकळी : तालुक्यातील महान धरण परिसरातील जंगलात एकाच दोरीला गळफास घेतलेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्येची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले, तरी पोस्टमार्टम अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.  किशोर बळीराम सोनटक्के (वय ४०, रा. कानडी ता. मुर्तिजापूर जि. अकोला) आणि किशोर मारोती बोडखे (वय ६०, रा. वरुड ता. मंगरूळपीर जि. वाशिम) अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही ९ मे २०२६ पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी सोनटक्के यांची बेपत्ता नोंद पिंजर पोलीस ठाण्यात, तर बोडखे यांची नोंद मंगरूळपीर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

दरम्यान, १० मे रोजी मृतक किशोर सोनटक्के यांचा भाचा रोहन दत्तात्रय महल्ले (रा. शेलू खुर्द, ता. बार्शीटाकळी) याला मामाने व्हॉट्सअॅकपवर एक संदेश पाठविला होता. त्या संदेशात दोघांनी महान धरणाजवळील बिहाड माथा शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

घटनास्थळी दोघांचे मृतदेह एकाच दोरीच्या टोकाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांना मृतकांनी नातेवाईकांशी केलेल्या शेवटच्या कॉलची रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅ पवरील सुसाईड नोट तसेच घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद न वाटल्याने प्रथमदर्शनी आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, पोलिसांनी कोणतीही घाईगडबडीत निष्कर्ष काढले नसून, पोस्टमार्टम अहवाल, कॉल डिटेल्स, मोबाईल डेटा, व्हॉट्सअॅ प संदेश आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ तसेच पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top