Gram Vikas Junior College : बाभुळगाव जहागीर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातून खुशी इलियास पटेल हिने ७८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रतीक वाघ याने ७१ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळविले.

उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामविकास महाविद्यालयात सत्कार
अकोला : बाभुळगाव जहागीर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातून खुशी इलियास पटेल हिने ७८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रतीक वाघ याने ७१ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळविले.
यंदाच्या निकालात महाविद्यालयातील १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी खुशी पटेल हिचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव उन्मेष रिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य अर्पणा रिंगणे, प्राध्यापक निलेश गावंडे, सुबोध वाठोरे आणि तृष्णा रिंगणे उपस्थित होते. तसेच द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी प्रतीक जामनिक आणि इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास कर्मचारी अर्जुन चव्हाण, राजेश ढवळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

