Mahabreaking

[breaking_news]

demand for strict action. :इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त कमेंटप्रकरणी बाळापूरात संताप; कठोर कारवाईची मागणी

demand for strict action. : सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह प्रतिक्रियांमुळे बाळापूर शहरातील वातावरण संवेदनशील बनले आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवर मुस्लिम समाजाविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप करत शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

demand for strict action.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

  जाकीर अहमद

बाळापूर : सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणाऱ्या तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह प्रतिक्रियांमुळे बाळापूर शहरातील वातावरण संवेदनशील बनले आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवर मुस्लिम समाजाविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप करत शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील एका इन्स्टाग्राम पेजवर बाळापूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टवर एका इन्स्टाग्राम युजर आयडीवरून मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत समाजात द्वेष व तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहम्मद शहजाद अब्दुल वाहीद तसेच बाळापूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या तक्रारीची प्रत पोलीस उपाधीक्षक कार्यालय, अकोला येथेही पाठविण्यात आली असून, सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मिक भावना भडकावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी संयम राखून कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या निवेदनावर मो. नदीम, मो. नासीर, मो. रिझवान कुरैशी, आसिफ शाह, सैय्यद सलीम, खलील पंजाबी (नगरसेवक), डॉ. मोहम्मद फैयाज, मो. सऊद (नगरसेवक), मो. अशफाक उर्फ बाबू आदींची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top