Mahabreaking

[breaking_news]

Jaykumar Thokal :मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या तालुका समितीत जयकुमार ठोकळ यांची निवड

Jaykumar Thokal : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तालुका समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पळसो येथील जयकुमार ठोकळ यांची निवड करण्यात आली आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या निर्देशानंतर ही समिती स्थापन करण्यात आली असून पाच शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विभागीय अधिकारी, अकोला कार्यालयाकडून याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतरस्ते विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jaykumar Thokal

अकोला पूर्व मतदारसंघातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांना समितीत स्थान ; आ. रणधीर सावरकरांच्या निर्देशानंतर समिती गठीत

संजय तायडे
अकोला : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील तालुका समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पळसो येथील जयकुमार ठोकळ यांची निवड करण्यात आली आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या निर्देशानंतर ही समिती स्थापन करण्यात आली असून पाच शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विभागीय अधिकारी, अकोला कार्यालयाकडून याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतरस्ते विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महसूल व वन विभागाच्या विविध शासन निर्णयांच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार संबंधित शेतकऱ्यांची निवड करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुकर रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. विशेषतः शेतीमाल वाहतूक, कृषी उत्पादनाची बाजारपेठांपर्यंत पोहोच आणि ग्रामीण दळणवळण सुधारण्यासाठी या योजनेला महत्त्व दिले जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीत स्थानिक पातळीवरील प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने समितीची रचना करण्यात आली आहे.
तालुका समितीत समाविष्ट करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये पळसो येथील जयकुमार ठोकळ,एकलारा येथील राजेश बेले, माझोड येथील राजेश ठाकरे, पळसो येथील जयकुमार ठोकळ, म्हैसांग येथील मनोज देशमुख आणि बोरगाव मंजू येथील पंकज वाडीवाले यांचा समावेश आहे. संबंधित शेतकरी हे आपल्या गावांमध्ये प्रगतशील शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी विकासासाठी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.
जयकुमार ठोकळ हे पळसो बढे येथील माजी सरपंच आहेत. तसेच विद्यमान अकोला तालुका कृषी आत्मा समिती अध्यक्ष तथा भाजपा तालुका सरचिटणीस, अशासकीय कामगार कल्याण मंडळ सदस्य आहेत. तसेच शांतता समितीचे सदस्य म्हणूनही ते सक्रीय आहेत. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि गरजा थेट समितीपुढे मांडल्या जाणार असून, पाणंद रस्ते विकासाच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top