Mahabreaking

[breaking_news]

Conduct CID Inquiry  :जिगाव प्रकल्पातील पाईप जळीत प्रकरणाची सीआयडी चौकशी करा; सुबोध सावजी यांची मागणी

Conduct CID Inquiry  :जिगाव प्रकल्पातील सुमारे ५० कोटी रुपये किमतीच्या पाईप जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली होती.  या प्रकरणामागे केवळ अपघात नसून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि उच्चस्तरीय संगनमत असण्याची शक्यता व्यक्त करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सीआयडीमार्फत सखोल चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

Conduct CID Inquiry 

डोणगाव :  जिगाव प्रकल्पातील सुमारे ५० कोटी रुपये किमतीच्या पाईप जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली होती.  या प्रकरणामागे केवळ अपघात नसून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि उच्चस्तरीय संगनमत असण्याची शक्यता व्यक्त करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सीआयडीमार्फत सखोल चौकशीची जोरदार मागणी केली आहे.

या संदर्भात सावजी यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना अधिकृत पत्र पाठवून प्रशासनावर दबाव वाढवला आहे. जिगाव प्रकल्प परिसरात साठवून ठेवलेले पाईप भीषण आगीत जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेभोवती अनेक संशय निर्माण झाले आहेत.

सावजी यांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रशासनाला अडचणीत आणणारे ठरत आहेत. संबंधित पाईपची खरेदी नेमकी कोणत्या विभागातून झाली, साठवणुकीची जबाबदारी कोणाकडे होती, तसेच एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असतानाही अशी घटना कशी घडली, याची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत. यामुळे या प्रकरणात निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक घोटाळा, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

पत्रात सावजी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, या घटनेत केवळ निष्काळजीपणा नसून भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, जनतेच्या करातून उभारलेल्या निधीचा अशा प्रकारे अपव्यय होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत सावजी यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणावर आता पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top