Sujata More became a police : सवडद येथील सुजाता मोरे हीने जिद्द , चिकाटी व अथक परिश्रमातून पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे .

साखरखेर्डा : सवडद येथील सुजाता मोरे हीने जिद्द , चिकाटी व अथक परिश्रमातून पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे .
प्रत्येक क्षेत्रात महिला कर्तबगार व्यक्तीमत्व म्हणून नाव मिळवून आपल्या गावाचा झेंडा अटकेपार नेत आहेत . सवडद येथील शेतमजूर कुटुंबातील शिवाजी नामदेव मोरे यांनी आपल्या मुलींना शिक्षण देऊन सन्मानाने जिवन जगता यावे,सुजाता हिला उच्च शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी दिली.सुजाता हीने सवडद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ७ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १० पर्यंतचे शिक्षण साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये घेतले. ११ वी १२ वी एस ई एस ज्युनिअर कॉलेज मध्ये पुर्ण केले . होमगार्ड म्हणून बुलढाणा येथे नियुक्ती झाली असताना , तेथूनच पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेताना . जालना येथे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुजाता मोरे हिने सर्व शारिरीक परिक्षा उत्तीर्ण केल्या आणि अखेर तिची जिद्द फळाला आली . सवडद येथील माजी सरपंच रुक्मिणी तेजराव देशमुख यांनी सुजाता , तीचे वडील शिवाजी आणि आई सविता यांचा सत्कार केला . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख , माजी सरपंच रुपराव देशमुख , गणेश देशमुख , गजानन काळे , सारंग देशमुख , राहूल देशमुख उपस्थित होते .

