Mahabreaking

[breaking_news]

Four men kill a youth :लग्न समारंभात किरकोळ वादातून चौघांनी युवकाला संपविले  

Four men kill a youth :लग्नसमारंभात झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना २५ एप्रिल रोजी रात्री खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शोएबखान अमिनखान ( २२) असे मृतक युवकाचे नाव आहे.

Four men kill a youth

शिवाजीनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल ; खामगाव शहरात खळबळ

खामगाव : लग्नसमारंभात झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना २५ एप्रिल रोजी रात्री खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शोएबखान अमिनखान ( २२) असे मृतक युवकाचे नाव आहे.

भरधाव दूधवाहू गाडीची स्कुटीला धडक; दोन जखमी, चालक फरार

शोएबखान अमिनखान ( २२) हा युवक २५ एप्रिल रोजी रात्री जोशी लेआउट येथील मैदानावर सुरू असलेल्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आला होता. रात्री सुमारे १०.०० ते १०.४० वाजण्याच्या दरम्यान नृत्य करण्याच्या कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाला. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद पुढे वाढत गेला.या वादातूनच चार युवकांनी  शोएबखान याच्यावर चाकू, फायटर, वस्तरा व दगड यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद साबीर शेख मुसा (३६, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) यांच्या तक्रारीवरून  शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब (सर्व रा. बर्डे प्लॉट, खामगाव) तसेच शेख रफिक (रा. अकोला) यांच्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील  तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्याकडे सोपविण्यात आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top