Mahabreaking

🔴 BREAKING
Shramanera Training Camp :वाडेगावात श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ, ३० शिबिरार्थी सहभागी Cylinder Explosion at Umra :उमरा येथे सिलेंडरचा स्फोट : दोन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान Jaysing Patil Appointed  :जयसिंग पाटील यांची पलूस ठाण्यावर वर्णी ; गुन्हेगारीवर अंकुश लागणार Tipper Seized at Chinchkhed :वाळू माफीयाविरुध्द धडक कावाई सुरूच; चिंचखेड येथे टिप्पर केले जप्त Burglarize House and Shop :आरेगाव येथे चोरट्यांचा हैदोस, घर व दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास Jijamata Vidyalaya :विद्यालय हे ग्रामीण भागातील आदर्श विद्यालय :  पंजाबराव हाडे Shramanera Training Camp :वाडेगावात श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ, ३० शिबिरार्थी सहभागी Cylinder Explosion at Umra :उमरा येथे सिलेंडरचा स्फोट : दोन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान Jaysing Patil Appointed  :जयसिंग पाटील यांची पलूस ठाण्यावर वर्णी ; गुन्हेगारीवर अंकुश लागणार Tipper Seized at Chinchkhed :वाळू माफीयाविरुध्द धडक कावाई सुरूच; चिंचखेड येथे टिप्पर केले जप्त Burglarize House and Shop :आरेगाव येथे चोरट्यांचा हैदोस, घर व दुकान फोडून ५५हजारांचा एवज लंपास Jijamata Vidyalaya :विद्यालय हे ग्रामीण भागातील आदर्श विद्यालय :  पंजाबराव हाडे

Cylinder Explosion at Umra :उमरा येथे सिलेंडरचा स्फोट : दोन घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

Cylinder Explosion at Umra : सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाले. या आगीत दोन कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना  पातुर तालुक्यातील उमरा येथे मंगळवारी (२३ एप्रिल) रोजच्या दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली.

Cylinder Explosion at Umra

 दोन कुटुंबांचा संसार उघड्यावर ; नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी

राहुल सोनोने

दिग्रस बू: सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाले. या आगीत दोन कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना  पातुर तालुक्यातील उमरा येथे मंगळवारी (२३ एप्रिल) रोजच्या दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली.

उमरा येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने समाधान चुनडे आणि भागवत चुनडे या काका-पुतण्यांच्या घरांना आग लागली. या आगीत दोन्ही घरे  पूर्णतः जळून खाक झाली. स्फोट इतका तीव्र होता की घरातील अन्नधान्य, कपडे तसेच रोख रक्कम यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले.घटनेच्या वेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य घरात नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, ही दिलासादायक बाब ठरली. स्फोटाची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.दरम्यान, एका घरामागे बांधलेल्या दोन गाईंना ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या  मार्गदर्शनाखाली बीट जमादार दिनेश झटाले, म्हात्रे मेजर, यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून, प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top