Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी

Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा

Solve Murder Case : तीन वर्षापूर्वी सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवकाची हत्या करून मृतदेह हॉटेलच्या काउंटरखाली पुरवला. तीन वर्षांपासून आरोपी निर्धास्त असतानाच मेहकर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. 21 एप्रिल रोजी मेहकर पोलिसांनी हॉटेलमध्ये पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. विनोद अश्रुबा नवले असे मृतक युवकाचे नाव आहे.चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशा या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

Solve Murder Case

 हॉटेलच्या जागेत पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष काढले बाहेर: दोन आरोपी गजाआड

 मेहकर:तीन वर्षापूर्वी सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवकाची हत्या करून मृतदेह हॉटेलच्या काउंटरखाली पुरवला. तीन वर्षांपासून आरोपी निर्धास्त असतानाच मेहकर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. 21 एप्रिल रोजी मेहकर पोलिसांनी हॉटेलमध्ये पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. विनोद अश्रुबा नवले असे मृतक युवकाचे नाव आहे.चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशा या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

मेहकर तालुक्यातील  सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले हे तीन वर्षापूर्वी बेपत्ता झाले होते. याविषयी मेहकर पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद घेण्यात आली. या युवकाची हत्या करून  त्याचा मृतदेह जामगाव शिवारातील एका हॉटेलच्या काउंटर खाली जमिनीत पुरण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतातील हॉटेलच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले असता मृतकाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले.

जामगाव शिवारातील बाबू भाई कुरेशी यांच्या शेतातील काही जागा भाड्याने घेऊन तेथे सचिन उगले नामक युवकाने ढाबा कम हॉटेल सुरू केले होते. त्याने सुनील जाधव यांच्याकडून काही रक्कम उसनवारीवर घेतली होती. सुनील त्याच्याकडे सतत या रकमेची मागणी करत होता. ती तो देऊ न शकल्यामुळे मला एकाचा खून करायचा आहे ,त्यासाठी तू मदत कर ,वाटल्यास पैसे देऊ नको असे जाधवने उगलेला सांगितले.सुकळी येथील सदर सुनील जाधव आणि मृतक ट्रक चालक  विनोद नवले दोघे मित्र होते. तीन वर्षांपूर्वी दोघा मित्रांनी सचिन उगले याच्या हॉटेलवर जाऊन भरपूर मद्यप्राशन केले. तिथेच विनोद नवले याचा खून करून त्याचे प्रेत हॉटेलच्या काउंटर खालील जागेत पुरण्यात आले,अशी माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना होऊन तीन वर्षे पर्यंत पोलिसांनाही कोणताच सुगावा लागत नव्हता. अचानकपणे काल पोलिसांना तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आणि आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मृतकाच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने सदर ठिकाणी अनेक नमुने घेतले. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी सचिन उगले आणि सुनील जाधव यांच्याविरुदध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top