Public Awareness Campaign : प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता (PM Rahat) योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात रोड सेफ्टी व्हिजन अंतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा व अपघातानंतर तात्काळ मदतीचे महत्त्व अधोरेखित केले.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गंत विशेष उपक्रमाचे आयोजन
आगाखान पठाण
अकोला : प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता (PM Rahat) योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात रोड सेफ्टी व्हिजन अंतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा व अपघातानंतर तात्काळ मदतीचे महत्त्व अधोरेखित केले.

PM Rahat योजनेअंतर्गत रस्ता अपघातातील जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी तसेच ‘गुड समॅरिटन’ संकल्पनेनुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचा अपघाती विमा उतरवलेला नाही अशा व्यक्तीचा अपघात झाल्यास, त्या व्यक्तीस कोणत्याही खाजगी रुग्णालयात दीड लाख रुपयांपर्यंत किंवा सात दिवसांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपघाताच्या प्रसंगी मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत जनजागृती वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला. तसेच अपघात झाल्यास तात्काळ मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती वाढून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा राष्ट्रीय माहिती प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, iRAD नोडल अधिकारी शुभम थोरात, मोटार वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर तसेच परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व इतर शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

