Mahabreaking

[breaking_news]

Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन

Sanghatan Srujan Abhiyan : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पातुर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक ते जिल्हा पातळीवरील संघटनात्मक बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन मजबुतीवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी देशभरात हे अभियान राबवण्यात येत  आहे.

Sanghatan Srujan Abhiyan

जाकीर अहमद

पातुर :  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पातुर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक ते जिल्हा पातळीवरील संघटनात्मक बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन मजबुतीवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी देशभरात हे अभियान राबवण्यात येत  आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक तथा आंध्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष जी. रुद्र राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल २०२६ रोजी संगम लॉन, पातुर येथे ही बैठक उत्साहात झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक दिलीपराव सरनाईक आणि संदेश सिंघलकर यांच्यासह अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, तालुकाध्यक्ष राजेश गावंडे, शहराध्यक्ष शेख मुख्तार अहमद तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जी. रुद्र राजू यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनातील सध्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदांसाठी सक्षम, कार्यक्षम आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाची निवड करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, आगामी काळात पक्ष अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय नेटवर्क उभारण्याचे निर्देश दिले. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचनांची सविस्तर नोंद घेण्यात आली असून, त्या आधारे पक्षांतर्गत फेरबदल व धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

स्थानिक स्तरावर काँग्रेसचे अस्तित्व बळकट करण्यासाठी आणि गटबाजी कमी करण्यासाठी या अभियानातून प्रयत्न करण्यात येत आहे. या अभियानामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच या अभियानाचा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये लाभ होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top