Dr. Babasaheb Ambedkar : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोरगाव मंजू येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. भव्य दिव्य रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विराजमान करून मिरवणुक सिध्दार्थ नगर स्थित बुध्द विहार येथुन प्रारंभ झाली. मिरवणुकीत शहरातील सर्वच समाज बांधव आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बोरगाव मंजू शहरात ठिकठिकाणी अभिवादन : विविध कार्यक्रमातून महामानवाला अभिवादन
संजय तायडे
बोरगाव मंजू : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोरगाव मंजू येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. भव्य दिव्य रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विराजमान करून मिरवणुक सिध्दार्थ नगर स्थित बुध्द विहार येथुन प्रारंभ झाली. मिरवणुकीत शहरातील सर्वच समाज बांधव आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून नगर प्रदक्षिणा घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. यावेळी ठाणेदार अनिल गोपाळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील खेडकर, महीला उपासक संघ यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी रथासह भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून अभिवादन केले. दरम्यान ढोल ताशांच्या निदानात मिरवणूक प्रारंभ झाली, विशेष शहरातील सिध्दार्थ नगर बुद्धविहार , रामजी नगर बुध्द विहार,भिम नगर स्थित बुध्द विहार येथे भिम जयंती साजरी करण्यात आली.
मिरवणुकीचे व्यवस्थापन अनाथ पिंडक बौद्ध विहार व्यवस्थापन समिती, सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांनी केले होते. शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणुक मार्गावरुन शहरात ठिक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून रथाचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचे समापन सिद्धार्थनगर येथील अनाथ पिंड डक बुद्ध विहारात समारोप त्रिशरण पंचशील घेऊन सांगता झाली. प्रसंगी आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणुक दरम्यान बोरगाव मंजू पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे,पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

