Ujjwal Public School : येथील उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केला व विनम्र अभिवादन केले.

बोरगाव मंजू : येथील उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केला व विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नरेंद्र सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांवर प्रकाश टाकला. “बाबासाहेबांचे विचार हे प्रगत समाजासाठी दीपस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी निता राजेंद्र बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या सोहळ्याला स्वाती जैन, मोहिनी इंगळे, स्मिता पाटील, कुमुद काटोले, शारदा देशमुख, दुर्गा आसोलमोल, प्रिती वाघमारे, सौ. मीना वानखडे, रूपाली कडू, रूपाली इंगळे, पूजा गावंडे, जया हगवणे, दिपाली देशमुख, अश्विनी माहुलकर आणि प्रतीक वानखेडे यांची उपस्थिती होती.शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

