Mahabreaking

[breaking_news]

Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Rajesh Keshavrao Gavande :अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी पातूर तालुकाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळणारे युवा नेतृत्व राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना अकोला जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजबांधवांचाही पाठींबा मिळत आहे. कुणबी समाजाला अध्यक्षपद दिल्यास काँग्रेस पक्षाला मोठा लाभ झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश गावंडे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

Rajesh Keshavrao Gavande
समाजबांधवांनी गावंडे यांच्या नियुक्तीला दिला पाठींबा; नियुक्ती झाल्यास पक्षाला मोठा फायदा होणार
ज़ाकिर अहमद

अकोला : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी पातूर तालुकाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळणारे युवा नेतृत्व राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना अकोला जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजबांधवांचाही पाठींबा मिळत आहे. कुणबी समाजाला अध्यक्षपद दिल्यास काँग्रेस पक्षाला मोठा लाभ झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश गावंडे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

अलीकडील लोकसभा निवडणुकीतही नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील समाजाने मतदानाचा टक्का वाढवून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा पुन्हा कुणबी समाजाकडे दिल्यास समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. तसेच पातूर आणि बाळापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील नेत्यांबरोबर राजेश गावंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे गावंडे यांना या समाजाचाही पाठींबा मिळू शकतो.

Rajesh Keshavrao Gavande

पातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्य करत असताना राजेश केशवराव गावंडे यांनी सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन घडवले आहे. बाभुळगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील रहिवासी असलेले गावंडे हे तरुण व तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वरिष्ठ नेत्यांशी समन्वय ठेवत काम करण्याची क्षमता, तसेच यापूर्वी त्यांनी काँग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तळागाळातील कार्यकर्ते आणि सर्व समाजातील लोकांशी सहज संवाद साधण्याची त्यांची शैली ही त्यांची विशेषता मानली जाते. नम्र स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असल्याचेही सांगितले जाते.

ज्ञानदेवराव ठाकरे, माजी आमदार, मूर्तिजापूर

Rajesh Keshavrao Gavande

पूर्वी काँग्रेस पक्षात कुणबी समाजाला प्रतिनिधित्व होते, तेव्हा काँग्रेस पक्षाचे सुगीचे दिवस होते. हेच या लोकसभा निवडणुकीवेळी नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यातील समाजाने मतदानाचा टक्का वाढवून दाखवून दिले. आत्ताही जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा कुणबी समाजाकडे दिली तर समाजाला एक पर्याय म्हणून चांगला फरक पडू शकतो. प्रत्येक राजकीय पक्षात समाजाला प्रतिनिधित्व असायला पाहिजे. राजेश केशवराव गावंडे, बाभुळगाव, ता. पातूर, जि. अकोला येथील हे तरुण, तडफदार नेतृत्व, वरिष्ठांशी कामाच्या माध्यमातून चांगला ताळमेळ ठेवणारे व्यक्तिमत्त्व, सर्व समाजात सहज वावरणारे आणि सर्वांशी नम्रतेने वागणारे आहेत. वरिष्ठांपासून ते तळागाळातील लोकांमध्ये मिसळणाऱ्या अशा व्यक्तीला जर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व दिले, तर जिल्ह्यातील समाजबांधवांना निश्चितच आनंद होईल.

अध्यक्ष सुभाष तु. दातकर, संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ, अकोला जिल्हा

अशा सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाला जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आल्यास जिल्ह्यातील समाजबांधवांमध्ये समाधानाची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top