Mahabreaking

🔴 BREAKING
Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम !

Provide proof of residence :मुख्यालयी वास्तव्याच्या पुरावा द्या, अन्यथा घरभाडे भत्ता विसरा

Provide proof of residence : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयी वास्तव्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. अन्यथा घरभाडे भत्ता बंद करण्याचा तसेच आतापर्यंत घेतलेला भत्ता वसुल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शिक्षण विभागाने याविषयी आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे, मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.

Provide proof of residence

अकोला जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश ; एप्रिल महिन्यापासून घरभाडे भत्ता थांबवण्याचा इशारा

 

ज़ाकिर अहमद

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयी वास्तव्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. अन्यथा घरभाडे भत्ता बंद करण्याचा तसेच आतापर्यंत घेतलेला भत्ता वसुल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शिक्षण विभागाने याविषयी आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे, मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.

जिल्हा परिषदेंर्गत कार्यरत असलेल्या  आरोग्य सेवक, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक तसेच महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षक आदी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना एचआरए हाऊस रेंट अलाऊंन्स मिळतो. मात्र, अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता एचआरए घेतात. त्यामुळे, प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार जर एखादा कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास नसताना HRA घेत असल्याचे आढळून आले, तर त्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच अशा प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने घेतलेला HRA व्याजासह वसूल करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत मुख्यालयात वास्तव्यास असल्याचा पुरावा सादर करावा लागेल. निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास एप्रिल 2026 पासून त्यांच्या वेतनातील HRA भत्ता थांबविण्यात येईल.

किरायाने राहत असल्यास भाडेकरार (Rent Agreement) सादर करणे आवश्यक असून त्यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा, घरमालक व कर्मचारी यांचे आधार कार्ड तसेच भाड्याच्या घराचा संपूर्ण पत्ता नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दरम्यान, या आदेशामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये हालचाल वाढली असून अनेक कर्मचारी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top