Mahabreaking

[breaking_news]

Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड

Accused who fled : शिवणी येथ अभिषेक रविंद्र गवई  या युवकावर चाकुने हल्ला करून पळून जाणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अवघ्या दोन तासात अटक केली. रेल्वेने पळून जाण्यापूर्वीच पथकाने दोन्ही आरोपींना गजाआड केले.

Accused who fled

सिनेस्टाईल पाठलाग करून रेल्वेने पळून जाण्यापूर्वीच केली अटक

संजय तायडे 

 अकोला: शिवणी येथ अभिषेक रविंद्र गवई  या युवकावर चाकुने हल्ला करून पळून जाणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अवघ्या दोन तासात अटक केली. रेल्वेने पळून जाण्यापूर्वीच पथकाने दोन्ही आरोपींना गजाआड केले.

Accused who fled

शिवणी अकोला येथे 10 एप्रिल रोजी अभिषेक रविंद्र गवई वय २३ वर्षे रा.डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी अकोला  या युवकावर अयोग जिवन सावद वय २० वर्षे रा. बहुजन नगर शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय २० वर्षे रा. राहुल नगर शिवणी अकोला यांनी जुन्या वादातून चाकुने हल्ला करून गंभीर जख्मी केले. त्यात अभिषेक रविंद्र गवई याचा मृत्यु झाला.  या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन   पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक यांनी स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना या गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करणे करीता आदेशीत केले. पो. नि. शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी टिमसह घटनास्थळी भेट देवुन यातील आरोपींची सखोल माहीती काढुन स्था.गु.शा. अकोलाचे २ पथक, पो.स्टे. एम.आय.डी.सी. चे एक पथक तयार केले. मिळालेल्या माहीतीच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखेचे पथक आरोपीतांना अटक करण्यासाठी रवाना केले.

या  पथकाने तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहीतीवरून आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पो नि शंकर शेळके हे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वेस्टेशन परिसरात पोहचले. त्याठिकाणी आरोपी  अयोग जिवन सावद  व गणेश दयानंद सोनी यांनी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकास पाहुन पळुन चालत्या रेल्वे मध्ये बसण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पो नि शंकर शेळके व त्यांच्या पथकाने आरोपीतांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीतांना रेल्वेमध्ये बसण्यापुर्वीच जेरबंद केले. तसेच अकोला शहरामध्ये या घटनेमुळे घडणा-या अप्रीय घटनेस पायबंद केले. आरोपीतांना नमुद गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरील मृतकाचा खुन हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले.  या आरोपींना पुढील कारवाई कामी पो.स्टे. एम.आय.डी.सी. अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पो.स्टे. एम.आय.डी. सी. हे करित आहे.

ही कारवाई   पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक , अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी  यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पो.उप.नि. विष्णु बोडखे व पोलीस अमंलदार शेख हसन, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अन्सार अहमद, श्रीकांत पातोंड, चालक मनिष ठाकरे, रामकिसन डोईफोडे यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top