Mahabreaking

[breaking_news]

High Drama on Samruddhi Expressway :समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; बॅटरी घेऊन जाणारा ट्रक खाक

High Drama on Samruddhi Expressway :समृद्धी महामार्गावर इन्वर्टरच्या बॅटऱ्या घेऊन जात असलेल्या ट्रकला १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी आठ च्या सुमारास दुसरबीड जवळ आग लागली. या आगीत ट्रक व त्यामधील बॅटरी पूर्णतः जळून खाक झाल्या. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मदत कार्य केले. . समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशामक वाहन तसेच मेहकर नगरपालिकेचे एक अग्निशमन दल तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

High Drama on Samruddhi Expressway

दुसरबीड जवळील घटना ; सुदैवाने जीवीत हानी टळली

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा/ डोणगाव : समृद्धी महामार्गावर इन्वर्टरच्या बॅटऱ्या घेऊन जात असलेल्या ट्रकला १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी आठ च्या सुमारास दुसरबीड जवळ आग लागली. या आगीत ट्रक व त्यामधील बॅटरी पूर्णतः जळून खाक झाल्या. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मदत कार्य केले. समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशामक वाहन तसेच मेहकर नगरपालिकेचे एक अग्निशमन दल तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

बनारस येथून यूपी ६५ आर डी २१४० या क्रमांकाच्या ट्रकमध्ये  इन्व्हर्टर बॅटरी घेऊन  गाजीपूर येथील चालक रोहित कुमार हा समृद्धी महामार्गाने नाशिककडे निघाला होता.  दुसरबीडजवळ चॅनेल क्रमांक ३१२ वर मागे ठेवलेल्या बॅटरीमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ट्रक रस्त्याच्या एका कडेला उभा केला. तोपर्यंत बॅटरींनी मोठी आग पकडली होती. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केल्याने ट्रक आणि त्यामधील बॅटरी जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती समजताच समृद्धी महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, शेख नासिर, नाजीम चौधरी, श्रीकृष्ण दूंगू, गायकवाड, इंदल राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशामक वाहन तसेच मेहकर नगरपालिकेचे एक अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ट्रक आणि त्यातील सर्व बॅटरीज जळून खाक झाल्या  तिन्ही वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत मोठी आर्थिक हानी झाली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी टळली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top