Mahabreaking

[breaking_news]

Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

Wife Murdered : टुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान अकोला तालुक्यातील यावलखेड येथे घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी   आरोपी पतीला अवघ्या एका तासात अटक केली. वृषाली अनिल निंभोकार (वय ३२) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच अनिल ओंकार निंभोकार (वय ४२) असे आरोपी पतीचे नाव आहे.

Wife Murdered

संजय तायडे

  बोरगाव मंजू : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान अकोला तालुक्यातील यावलखेड येथे घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी   आरोपी पतीला अवघ्या एका तासात अटक केली. वृषाली अनिल निंभोकार (वय ३२) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच अनिल ओंकार निंभोकार (वय ४२) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वृषाली अनिल निंभोकार (वय ३२) या यावलखेड येथील रहिवासी होत्या. गुरुवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान घरगुती वादातून त्यांचे पती अनिल ओंकार निंभोकार (वय ४२) यांनी संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वृषाली गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे डे ऑफिसर पोलीस हवालदार उमेश पुरी यांनी फिर्यादी दीपक लक्ष्मण पिंजरकर (वय ५१, रा. विठ्ठल नगर, मोठी उमरी, अकोला) यांच्या जबानीवरून अप क्रमांक २८०/२०२६ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले.

घटनेनंतर आरोपी पती फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्वरित रवाना करण्यात आले. आरोपी अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालय परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन केले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. गोपाल जाधव, विष्णू बोडखे, तसेच कर्मचारी सुलतान पठाण, गोकुळ चव्हाण, मोहम्मद आमीर, अशोक सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके, उपनिरीक्षक मनोज उघडे, रविंद्र धुळे, हेडकॉन्स्टेबल आकाश यादव, सुदीप राऊत, प्रशांत विधळे, अक्षय देशमुख, शिवहरी लांडगे यांच्यासह पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top