Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Bus Driver Deteriorates : मेहकर पुणे बस चालकाची प्रकृती बिघडली, पाच तासानंतर मिळाला नविन चालक

Bus Driver Deteriorates : मेहकर – साखरखेर्डा – पुणे या बसवरील चालकाची प्रकृती बिघडल्याने तब्बल पाच तास एसटी बस साखरखेर्डा बसस्थानकावर उभी होती. वाहतूक नियंत्रक यांना कल्पना देऊनही चालकास जबरदस्तीने पाठविले असल्याने उपरोक्त प्रकार आज ७ एप्रिल रोजी सकाळी घडला.  बहुजन हिताय बहुजन सूखाय ,  हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराने वाक्याला अक्षरशः काळीमा फासली आहे .

Bus Driver Deteriorates

 प्रवाशी त्रस्त: वाहतूक निरीक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

साखरखेर्डा :  मेहकर – साखरखेर्डा – पुणे या बसवरील चालकाची प्रकृती बिघडल्याने तब्बल पाच तास एसटी बस साखरखेर्डा बसस्थानकावर उभी होती. वाहतूक नियंत्रक यांना कल्पना देऊनही चालकास जबरदस्तीने पाठविले असल्याने उपरोक्त प्रकार आज ७ एप्रिल रोजी सकाळी घडला.  बहुजन हिताय बहुजन सूखाय ,  हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराने वाक्याला अक्षरशः काळीमा फासली आहे .

या संदर्भात सविस्तर असे की, मेहकर पुणे ही बस  क्र एम एच ४०-v५७५१ दररोज सकाळी साखरखेर्डा येथून सकाळी ७ वाजता नियमित जात असल्याने आज दि ७ एप्रिल रोजी सदर बस साखरखेर्डा बसस्टॉपवर हजर झाली. दरम्यान चालक एस.एस. निकम यांची प्रकृती अचानक बिघडली. दरम्यान निकम यांनी सदर माहिती सहा. वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी मेहकर आगार यांना दिली.  मात्र, उशीराने चौधरी यांनी घोंगडे झटकत सकाळी अकरा वाजता पर्यायी चालक एस. यू. घुबे यांना पाठवले.  जवळपास पुणे जाणाऱ्या चाळीस प्रवाशांना पाच तास प्रतिक्षा करावी लागल्याने वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे यांच्या विषयी प्रवाशांना तीव्र संताप व्यक्त होत आहे .

 प्रकृती स्थिर नसतानाही लावली ड्युटी

मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती स्थिर नसल्याची तक्रार चालक एस. एस. निकम यांनी रात्रीच सहा वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी यांचेकडे केली होती.  मात्र, प्रवाशांचा देव समजल्या जाणाऱ्या चालकावर दबाव आणून डिवटी करावीच लागते म्हणून जबरीने डिवटी देण्यात आली. नोकरीत कसूर नये म्हणून चालकाने आपले कर्तव्य बजावले मात्र रापम चालकाकांना किती छेळतेय याची प्रचिती आली.  मेहकर आगाराने कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना देखील वेठीस धरले. मेहकर पुणे बस साखरखेर्डा बसस्टॉपवर सकाळी सात वाजता बरोबर हजार झाली चालकास अस्वस्थ वाटू लागल्याने लागलिच त्यांनी ही माहिती सहा वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी यांना दिली चौधरी यांनी दोन तास उशीराने कारवाई सुरू केली. त्यांनी नऊ वाजता पर्यायी चालक एस. यू .घुबे यांना यांना फोन केला सकाळी अकरा वाजता घुबे आपल्या कर्तव्यवर ऋजू होत बस पुण्याकडे रवाना केली.

    प्रवाशांनी केले चालकास भरती

मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती बिघडली असता तातडीने बसस्टॉपवर असलेल्या सर्जेराव मंडळकर यांनी चालकास दवाखान्यात भरती करण्याचे औदार्य दाखवले. सध्या प्रकृती स्थिर असली तरीही मेहकर आगाराने अजिबात ढूकूंनही बघितले नाही. पुणे जाणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः पाच तास त्रेधातिरपीट उडाली .

     ही बस आमच्या शहरासाठी मोठी सुविधा आहे. मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती बिघडली असता तातडीने मेहकर आगाराने दखल घेणं गरजेचं होतं मात्र चालकाबरोबरच प्रवाशांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सबंधितांवर विभागीय नियंत्रकांनी गंभीर पाऊले उचलली पाहिजेत.

-ललितकुमार अग्रवाल, व्यापारी, साखरखेर्डा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top