Mahabreaking

🔴 BREAKING
Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव

Dhamangaon to Masrul :धामणगाव ते मासरूळ डांबरी रस्ता गेला खड्यात, एक वर्ष आधीच झाली होती दुरुस्ती 

Dhamangaon to Masrul : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ ते धामणगाव या रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी मार्च 2025 ला या डांबरी रस्त्याची दुरुस्ती झाली. एका वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Dhamangaon to Masrul
सार्वजनिक बांधकाम विभाग चिखलीचे होतेय दुर्लक्ष

पंडित सावळे

मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ ते धामणगाव या रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी मार्च 2025 ला या डांबरी रस्त्याची दुरुस्ती झाली. एका वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पिंपळपाटीत जर्मन शेफर्डला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न ,दोघांविरुध्द गुन्हा

पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश वाहनधारक खड्डे चुकवून वाहन काढत असल्यामुळे, या रस्त्यावर वाहतूककोंडी देखील होत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत असल्यामुळे, या ठिकाणी अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे.धामणगाव ते मासरूळ जाणाऱ्या रस्त्यावरील हजारीवाडी जवळील या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मासरूळ ते धामणगाव जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर हे खड्डे अधिकच मोठे झाले असून, खड्ड्यातील दगड-गोटे रस्त्यावर येऊन इतरत्र पसरले आहेत. या बारीक दगड-गोट्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रात्रीच्या सुमारास तर खड्ड्यांचा अंदाज लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक संथ गतीने वाहन चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून, या वाहतूककोंडीमुळे रहिवाशांना रस्ता ओलांडणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे किरकोळ अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. पाणी पडल्यामुळे तर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या खड्ड्यांमध्ये पाणी व काडी-कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील नुकसान होत आहे.मागील वर्षी प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात या रस्त्याची डांबर टाकून दुरूस्ती केली जाते. मात्र, यंदा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसून, खड्ड्यांची साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या  लग्नसराईत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन, रस्त्यांत खड्डे की खड्डयांत रस्ते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण आहे.

धामणगाव ते मासरूळ या डांबरी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत आहेत. जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात, वाहतूक कोंडी, वाहन दुरुस्तीचा आर्थिक फटका आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वतः खड्डे बुजवत असून, तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी करत आहेत
दिलीप शिणकर,माजी पंचायत समिती सदस्य मासरूळ

मासरूळ ते धामणगाव या रस्त्याचे काम मंजूर झाले असून सदर रस्त्याची निविदा काढून संबंधित ठेकेदाराला त्याचे काम दिले आहे.ठेकेदारांना लवकरात लवकर सूचना करून रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल.ठेकेदाराने त्वरित काम चालू नाही केले तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

रवींद्र कड,उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top