Mahabreaking

[breaking_news]

Hanuman Jayanti Celebration :बोरमळी येथे हनुमान जयंती उत्सव संपन्न! ५० वर्षाची धार्मिक परंपरा कायम

Hanuman Jayanti Celebration : तालुक्यातील बोरमळी येथील हनुमान मंदिर संस्थान परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यातील एक असं गाव ज्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलून आदर्श घडविण्यासाठी शासनाचे लाखो रुपयाचे विविध पुरस्कार प्राप्त केले.

Hanuman Jayanti Celebration

बबन इंगळे

बार्शीटाकळी:तालुक्यातील बोरमळी येथील हनुमान मंदिर संस्थान परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यातील एक असं गाव ज्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलून आदर्श घडविण्यासाठी शासनाचे लाखो रुपयाचे विविध पुरस्कार प्राप्त केले. अशा बोरमळी शेलगाव या १४०० लोकवस्तीच्या गावात गेल्या ५० वर्षापासून हनुमान जयंतीचा आगळावेगळा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी सुद्धा या सोहळ्यानिमित्त गावातील हनुमान मंदिरात आकर्षक रोषणाई करून भव्य असा मंडप उभारला होता..

 गावच्या लेकी व पाहुण्यांची रेलचेल

हनुमान जयंतीच्या सोहळ्यानिमित्त बोरमळी शेलगाव येथील गावच्या लेकी ह्या सासरहून कुटुंबासह गावात दाखल होतात व राज्यात विविध ठिकाणी शासकीय, निमशासकीय नोकरीत असलेले गावातील अधिकारी, कर्मचारी हे आपल्या गावी येऊन एकत्रितपणे सार्वजनिक सोहळा साजरा करण्यासाठी येतात . येथील १०० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी म्हणून शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असून या जयंती सोहळ्यासाठी आपला लाखो रुपये एका महिन्याचा पगार ते दरवर्षी देत असतात.

भव्य महाप्रसाद वाटपाची परंपरा

या जयंती उत्सवानिमित्त देवाला कबूल केलेला नवस फेडणाऱ्यांची संख्या सुद्धा सर्वाधिक असते .ज्याचे करिता हा नवस केल्या जातो त्या व्यक्तीच्या वजनाचे भारोभार महाप्रसाद वाटप करण्यात येते. ती परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून याव्यतिरिक्त संस्थान प्रशासनाकडून शेकडो क्विंटल गुळाचा प्रसाद पॅकिंग करून जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना वाटप केला जातो.बंजारा भजन, मिरवणूक ,भव्य महाप्रसाद वाटप आदी विविध नाविन्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हनुमान जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला . डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा जयंती उत्सवाचे आकर्षण ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top