Mahabreaking

[breaking_news]

Selling Petrol Illegally :अवैध पेट्रोल विक्री करणे भोवले, एकावर गुन्हा दाखल

Selling Petrol Illegally : इराक आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युध्दामुळे पेट्रोल आणि डिझेलचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. याचा लाभ घेत काही जणांनी अवैध पेट्रोल विक्री सुरू केली आहे. पिंजर पोलिसांनी अवैध पेट्रोल विक्री करणाऱ्या एकावर कारवाई करीत ४५ लिटर पेट्रोल केले जप्त केले.

Selling Petrol Illegally

पिंजर पोलिसांची कारवाई, ४५ लिटर पेट्रोल केले जप्त

बार्शीटाकळी : इराक आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युध्दामुळे पेट्रोल आणि डिझेलचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. याचा लाभ घेत काही जणांनी अवैध पेट्रोल विक्री सुरू केली आहे. पिंजर पोलिसांनी अवैध पेट्रोल विक्री करणाऱ्या एकावर कारवाई करीत ४५ लिटर पेट्रोल केले जप्त केले.

पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ एप्रिल रोजी अवैधरीत्या पेट्रोल विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यावरून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा टी पॉईंट जवळ एका टीन शेडमध्ये अवैधरीत्या पेट्रोलची विक्री होत असल्याचे आढळून आले. पिंजर पोलिसांनी याबाबतची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांना दिल्यावरून ते घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये आरोपी अब्दुल जावेद अब्दुल सईद रा. नायकपुरा पिंजर याचे कडून ४५ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले .आरोपी विरुद्ध पिंजर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.के. चंद्रकांत रेड्डी, मुर्तीजापुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे ,पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे, चंद्रशेखर गोरे, नरहरी देवकते, आनंद नागे ,पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top