Mahabreaking

[breaking_news]

9.8 kg of Ganja Seized :मोताळ्यात 9.8 किलो गांजा जप्त, एकास केली अटक

9.8 kg of Ganja Seized :शहरात अवैधपणे गांजा विक्री करणाऱ्यास मोताळा पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून 9 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकून 1 लाख 96 हजार रुपयांचा एवज जप्त केला.  अजय रोहीदास मोहीते  रा. कॉटन मार्केट परिसर, मोताळा असे आरोपीचे नाव आहे.

9.8 kg of Ganja Seized

1.96 लाख रुपयांचा एवज जप्त: आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

मोताळा : शहरात अवैधपणे गांजा विक्री करणाऱ्यास मोताळा पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून 9 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकून 1 लाख 96 हजार रुपयांचा एवज जप्त केला.  अजय रोहीदास मोहीते  रा. कॉटन मार्केट परिसर, मोताळा असे आरोपीचे नाव आहे.

मोताळा शहरातील कॉटन मार्केट परिसरात अजय मोहिते याने राहत्या घरात गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मोताळा पोलिसांना मिळीली. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक तथ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात  पो. नि. सिताराम मेहेत्रे, स.पो.नि. बालाजी शेंगेपल्लु, पो.उप. नि. राजेंद्र कपले, पोलीस अंमलदार हेकॉ नंदकिशोर धांडे , अमोल खराडे , सुपडसिंग चव्हाण , श्रीकांत चिटवार , विजय सुरळकर , चालक हेकॉ मनोहर पंडीत , अनिता मोरे , पोकॉ प्रमोद साळोक , रविंद्र नरोटे , आकांक्षा जऱ्हाड यांनी   आरोपी अजय रोहीदास मोहीते याच्या घरात धाड टाकली. दोन पंचासमक्ष रेड करून घरातील 9 किलो 800 ग्राम गांजा जप्त केला. पोलिसांनी एक लाख 96 हजार रुपयांचा एवज जप्त केला.पो.उप. नि. राजेंद्र कपले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय मोहिते विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास  API बालाजी शेंगेपल्लु हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top