Mahabreaking

🔴 BREAKING
RTE Admission Lottery :RTE प्रवेशाची लॉटरी जाहीर; बुलढाणा जिल्ह्यात २८०१ विद्यार्थ्यांची झाली निवड No salary for four months :चार महिन्यांपासून वेतनच नाही,सांगा साहेब जगावे कसे! Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी RTE Admission Lottery :RTE प्रवेशाची लॉटरी जाहीर; बुलढाणा जिल्ह्यात २८०१ विद्यार्थ्यांची झाली निवड No salary for four months :चार महिन्यांपासून वेतनच नाही,सांगा साहेब जगावे कसे! Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी

Massive Fire : शर्थीच्या प्रयत्नांनंतर पिंपरी सरहद्द येथील भीषण आग आटोक्यात

Massive Fire : मेहकर तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथे गावाशेजारी, मुंबई-नागपूर राज्य महामार्गालगत असलेल्या उकिरड्यांना रविवारी (दि. २९ मार्च) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. धुरामुळे समोरील दृश्य अस्पष्ट झाल्याने दोन ते तीन किरकोळ अपघातही घडले.

Massive Fire

उकिरड्यांना लागलेल्या आगीने महामार्ग धुराने वेढला; तासभर वाहतूक ठप्प

डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथे गावाशेजारी, मुंबई-नागपूर राज्य महामार्गालगत असलेल्या उकिरड्यांना रविवारी (दि. २९ मार्च) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. धुरामुळे समोरील दृश्य अस्पष्ट झाल्याने दोन ते तीन किरकोळ अपघातही घडले.

वाशीम जिल्ह्याच्या सीमेवरील पिंपरी सरहद्द हे गाव बुलढाणा जिल्ह्याला लागून असून, डोणगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून मुंबई-नागपूर राज्य महामार्ग जातो. महामार्गालगत मोठ्या प्रमाणात उकिरडे असून, त्याठिकाणी कचरा व शेण साठलेले असल्याने आग लागल्याचे सांगितले जाते.

आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे साम्राज्य महामार्गावर पसरल्याने वाहनचालकांना पुढील मार्ग दिसत नव्हता. संभाव्य अपघात टाळण्यासाठी गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वाहतूक बंद केली. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या कालावधीत वाहतूक पूर्णतः ठप्प होती. घटनेची माहिती मिळताच मेहकर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गावकरी आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त व अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग वेळेत आटोक्यात न आल्यास जवळील वस्तीस मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top