Mahabreaking

[breaking_news]

Emphasis on Basic Amenities :बाळापूरच्या विकासासाठी खासदारांच्या निवासस्थानी बैठक; मूलभूत सुविधांवर भर

Emphasis on Basic Amenities :नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या अकोला येथील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक विकासकामांचा आढावा घेऊन स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि रस्ते यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Emphasis on Basic Amenities

जाकीर अहमद

बाळापूर : नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या अकोला येथील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक विकासकामांचा आढावा घेऊन स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि रस्ते यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस नगरसेवक अब्दुल गुफरान (सज्जाद) अब्दुल गफ्फार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणींबाबत प्रतिनिधींनी थेट मांडणी केली. बैठकीत विशेषतः स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी, नियमित कचरा संकलनाची गरज आणि स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा ही गंभीर समस्या असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय, अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब मांडण्यात आली. दर्जेदार रस्ते बांधकाम आणि दुरुस्तीची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

खासदार अनुप धोत्रे यांनी उपस्थितांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीच्या शेवटी बालापूरच्या विकासकामांना गती देण्यासाठी समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांना लवकरच मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top