Mahabreaking

[breaking_news]

The Sant Sidaji Maharaj :शेकडो वर्षांची परंपरा जपणारा संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सव भक्तिभावात सुरू

The Sant Sidaji Maharaj : पातूर शहरातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव शनिवारी भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत प्राचीन अखंड ध्वज व टाळ यांची पारंपरिक पद्धतीने विधिवत उभारणी करण्यात आली.

The Sant Sidaji Maharaj

अखंड ध्वज उभारणीने गाजला महोत्सव; हजारो भाविकांची उपस्थिती

जाकीर अहमद

बाळापूर : पातूर शहरातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव शनिवारी भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत प्राचीन अखंड ध्वज व टाळ यांची पारंपरिक पद्धतीने विधिवत उभारणी करण्यात आली.

महोत्सवाच्या प्रारंभी भाविकांनी अखंड ध्वजाला स्नान घालून पूजा-अर्चा केली. मंत्रोच्चार, पारंपरिक विधी आणि जयघोषाच्या गजरात हा पवित्र ध्वज उभारण्यात आला. हा सोहळा पातूर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा महत्त्वपूर्ण क्षण मानला जातो.

श्रद्धेनुसार, संत श्री सिदाजी महाराजांनी इ.स. १८१० मध्ये या पवित्र ध्वज व टाळाची स्थापना केली, तर इ.स. १८१२ मध्ये त्यांनी समाधी घेतली. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून, दरवर्षी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात.

संत सिदाजी महाराजांचा जन्म पातूर येथील माहोकार या साध्या शेतकरी कुटुंबात झाला. वडील राघो माहोकार आणि आई आलोका यांच्या संस्कारातून त्यांच्यात समाजसेवा, अध्यात्म आणि लोककल्याणाची भावना बळकट झाली. त्यांनी आपल्या कार्यातून समाजप्रबोधन आणि लोककल्याणाचा संदेश दिला.

संत सिदाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रेरणादायी व चमत्कारिक कथा आजही भाविकांमध्ये श्रद्धेने सांगितल्या जातात. त्यांच्या कार्यामुळे पातूर परिसरात त्यांना ‘अवलिया पुरुष’ म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

यात्रा महोत्सवानिमित्त भजन-कीर्तन, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरलेला हा महोत्सव पातूरच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top