Mahabreaking

[breaking_news]

Two Killed : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; मालवाहु उलटल्याने दोन ठार

Two Killed : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी घडली. मेहकर-चिखली मार्गावरील नांद्रा धांडे फाट्याजवळ पिकअप वाहन उलटल्याने हा अपघात झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत.

Two Killed
चालकाला डुलकी लागल्याने घडला अपघात; मेहकर ते चिखली मार्गावरील नांद्रा धांडे फाट्यावरील घटना

मेहकर : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी घडली. मेहकर-चिखली मार्गावरील नांद्रा धांडे फाट्याजवळ पिकअप वाहन उलटल्याने हा अपघात झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर येथील बागवान कुटुंबीय सैलानी येथे दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एमएच-१३-सीटी-७८७० क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहन नांद्रा धांडे फाट्याजवळ आले असता चालकाला डुलकी लागल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि पिकअप उलटले.
या भीषण अपघातात अदनान शरीब बागवान आणि रिहान सय्यद बागवान यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात शहाना नबीसाहब बागवान (३४), शबाना शरीफ बागवान (३५), रफत शरीफ बागवान (१२), आफीफा आरिफ बागवान (६), बुशरा आरिफ बागवान (१३), आलिया अनिस बागवान (२५), अफिस रौफ बागवान (२५), पाशा मोहम्मद शाह बागवान (७५), मैमिश नबीसाहब बागवान (१५), हिना अरिफ बागवान (३०), अमीर बागवान (१३), अनस बागवान (१२), अबुजर बागवान (१०), साहेरा बागवान (६५) आदी जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनातील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मृत व जखमींची नावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मेहकर पोलिसांना कळवली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे वातावरण शोकमग्न झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top