Mahabreaking

[breaking_news]

General Body Meeting :मेहकर पंचायत समितीची आमसभा व सरपंच मेळावा मंगळवारी  

General Body Meeting :पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार पंचायत समिती मेहकर येथे सन २०२५-२६ ची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी वैभव लॉन, डोणगाव रोड, मेहकर येथे संपन्न होणार आहे.

General Body Meeting

 प्रश्न मांडण्याची संधी; सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहन

डोणगाव : पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार पंचायत समिती मेहकर येथे सन २०२५-२६ ची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी वैभव लॉन, डोणगाव रोड, मेहकर येथे संपन्न होणार आहे.

या सभेत सन २०२५ ते २०२६ या कालावधीतील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून आगामी कामांची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषयही चर्चेसाठी घेतले जाणार आहेत.

सरपंचांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक असून कोणताही प्रतिनिधी पाठवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी व सरपंचांनी त्यांच्या अडचणी व प्रश्न असल्यास दि. २८ मार्चपर्यंत पंचायत समितीकडे लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच संबंधित खातेप्रमुखांनी आवश्यक माहितीसह वेळेत उपस्थित राहावे, असे गटविकास अधिकारी दिनकराव खरात व सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top