Son kills father : मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिटवा येथे २ सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपी मुलास अवघ्या दोन तासात पिंजर पाेलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. बबन रामराव राऊत (५५) असे मृतकाचे नाव आहे.
बबन इंगळे
बार्शीटाकळी : मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिटवा येथे २ सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपी मुलास अवघ्या दोन तासात पिंजर पाेलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. बबन रामराव राऊत (५५) असे मृतकाचे नाव आहे.
२ सप्टेंबर रोजी रात्रीचे दरम्यान ग्राम टीटवा येथील फिर्यादी विनोद रामराव राऊत यांनी पिंजर पोलीस ठाण्यात दिलेल्या रिपोर्ट नुसार त्यांचा भाऊ बबन रामराव राऊत (५५) यांचा मुलानेच खून करून आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी जवळ मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे एक आव्हानच होते. अशावेळी स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पिंजर पोलिस यांनी संयुक्त तीन वेगवेगळे पथके बनवून शोध मोहीम सुरू केली.आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील शेलूबाजार येथून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी नवनाथ बबन राऊत ( २७) याने जन्मदात्या बापाला २सप्टेंबरचे रात्री अंदाजे १० ते १२.१५ वाजताच्या दरम्यान काठीने मारहाण करून व दोरीने गळ्याला फास आवळून खून केल्याची माहिती समोर आली. आरोपी हा रात्रभर शेतात लपून बसला आणि सकाळी छत्रपती संभाजी नगर येथे जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला हेरले. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनखाली पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे, पीएसआय अभिषेक नवघरे, गोपाल जाधव, जीपीएसआय दशरथ बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, चालक मनीष ठाकरे, हेपोकॉ नामदेव मोरे, नागसेन वानखडे, गजानन काळे, प्रदीप धामणे, नागेश दंदी, पो. कॉ. नरहरी देवकते, भूषण मुखमले, भागवत गांजवे मयूर खडसे, एच.जी. नजीर हुसैन , गणेश जानोरकर आदींनी कारवाई केली.