Mahabreaking

[breaking_news]

Swapnapurti Wine Bar :स्वप्नपूर्ती वाइनबारमधून रोख रक्कम व साहित्य लंपास

Swapnapurti Wine Bar :शहरातील टाकरखेड भागातील स्वप्नपूर्ती वाइन बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम व साहित्य असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnapurti Wine Bar
अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल; सीसीटीव्ही कॅमेराही केला लंपास

देऊळगाव राजा : शहरातील टाकरखेड भागातील स्वप्नपूर्ती वाइन बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम व साहित्य असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप देवराव कांबळे (वय ५३, व्यवसाय – मॅनेजर, रा. त्र्यंबक नगर, देऊळगाव राजा) यांच्या स्वप्नपूर्ती वाइन बारमध्ये २३ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० ते २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.२० या कालावधीत अज्ञात आरोपींनी कोंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर बारमधील रोख रक्कम ३ हजार रुपये तसेच डीव्हीआर, वायफाय उपकरणे व सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण १० हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून कायम अप. क्र. ११२/२०२६, कलम ३३४(१), ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार जाधव यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top