Mahabreaking

[breaking_news]

Rescued from Abuse :मारहाणीतून सुटका; बालिकेला ‘चाईल्ड हेल्पलाईन’ची जीवनदायी मदत

Rescued from Abuse : समाजातील बालहक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या १४ वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्पलाईन १०९८, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

Rescued from Abuse

 बालहक्कांसाठी यंत्रणा सजग; सावत्र आईच्या अत्याचारातून बालिकेची सुटका

 बुलढाणा : समाजातील बालहक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या १४ वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्पलाईन १०९८, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

२२ मार्च २०२६ रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेब यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली.

यानंतर चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

पोलिसांच्या मदतीने बालिकेला व तिच्या मोठ्या भावाला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बालिकेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्यानंतर समितीच्या आदेशानुसार तिच्या संरक्षणासाठी तिला सखी वन स्टॉप सेंटर, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. तसेच समुपदेशकांकडून तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेतून बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाज आणि प्रशासनाने अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी ‘१०९८’ या हेल्पलाईनचा वापर करून वेळेत मदत मिळवता येते, याचेही हे उदाहरण ठरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top