Darul Uloom Noor Mohammadi :शहरातील शतरंजीपुरा परिसरात स्थित दारुल उलूम अले-सुन्नत नूर मोहम्मदी या प्रतिष्ठित संस्थेत शैक्षणिक वर्ष 2026–2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणाचा समतोल साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेत विशेष भर दिला जात आहे.

जाकीर अहमद
बाळापूर : शहरातील शतरंजीपुरा परिसरात स्थित दारुल उलूम अले-सुन्नत नूर मोहम्मदी या प्रतिष्ठित संस्थेत शैक्षणिक वर्ष 2026–2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणाचा समतोल साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेत विशेष भर दिला जात आहे.
संस्थेमध्ये कुरआन शरीफ हिफ्ज (पाठांतर), इस्लामी शिक्षण, नैतिक मूल्यांचे प्रशिक्षण तसेच सांसारिक शिक्षणाच्या मूलभूत घटकांचे मार्गदर्शन दिले जाते. अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण तयार करण्यात आले असून, निवास व भोजनाची योग्य व्यवस्था देखील उपलब्ध आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येथे शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.
संस्थेच्या व्यवस्थापनाकडून पालकांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संस्थेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी हजरत मौलाना हाफिज सोहेल खान तसेच हजरत मौलाना हाफिज व कारी मुफ्ती अशफाक मिसबाही यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

