Mahabreaking

[breaking_news]

 the occasion of Eid :ईदनिमित्त हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; परस्पर शुभेच्छांचा वर्षाव

the occasion of Eid :पवित्र रमजान महिन्याच्या समारोपानंतर डोणगाव येथे २१ मार्च रोजी रमजान ईदचा सण उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला. सकाळी ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून देशात शांतता, ऐक्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.

the occasion of Eid

एकतेचा संदेश देणारी ईद; डोणगावात सलोखा आणि सौहार्दाचा उत्सव

डोणगाव : पवित्र रमजान महिन्याच्या समारोपानंतर डोणगाव येथे २१ मार्च रोजी रमजान ईदचा सण उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला. सकाळी ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून देशात शांतता, ऐक्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.

संध्याकाळी जामा मशिदीसमोर एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा उपक्रम पार पडला. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजातील बांधवांचे पुष्पहार व गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे डोणगावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

या प्रसंगी ठाणेदार अमरनाथ नागरे, माजी सरपंच मधुकरराव घिरके, संजय आखाडे, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, माजी पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव, सरपंच चरण आखाडे, सुरेश फिसके, सचिन गाभणे, अशोक वानखेडे, आसिफ खान, हमीद मुल्लाजी, रफीक शेख, डॉ. अजगर, अकबर खान पठाण, संजय पळसकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सण शांततेत पार पडला. डोणगावातील हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत असून, सण-उत्सवांच्या माध्यमातून बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top