Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर

Brawl over DJ dispute :डीजेच्या वादातून हाणामारी; गुंज प्रकरणात तिघे तुरुंगात

Brawl over DJ dispute : सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Brawl over DJ dispute

 साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर डीजे वाजविण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अनेक जण जखमी झाले होते.

या प्रकरणी अनिल तुपकर यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर यांच्यासह १४ जणांविरुद्ध मारहाणीचा आरोप केला होता. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून त्याच दिवशी एका आरोपीला अटक केली होती, तर इतर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी पुढील तपास करत शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना २० मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने प्रारंभी त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध साखरखेर्डा पोलिसांकडून सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top