Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Chief Executive Officer :दिग्रस बु. येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाहणी; विकासकामांचा सखोल आढावा

Chief Executive Officer :पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे ‘मुख्यमंत्री समृद्धी ग्राम’ अभियानांतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी भेट देत विविध शासकीय योजनांचा आणि गावातील विकासकामांचा आढावा घेतला.

Chief Executive Officer

‘समृद्धी ग्राम’ अभियानांतर्गत भेट; शाळा व योजनांच्या कामगिरीचे कौतुक

 राहुल सोनोने

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे ‘मुख्यमंत्री समृद्धी ग्राम’ अभियानांतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी भेट देत विविध शासकीय योजनांचा आणि गावातील विकासकामांचा आढावा घेतला.

बेलुरा बु.च्या विकासकामांची उच्चस्तरीय पाहणी; ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक

या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन घरपट्टी वसुली, वृक्षारोपण, लोकसहभाग उपक्रम, रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा तसेच सेतु केंद्रातील योजनांची माहिती घेतली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त जिल्हा परिषद केंद्र शाळा, दिग्रस बु. येथे भेट देत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि शालेय नोंदींची पाहणी केली. मुख्याध्यापक संजय बरडे व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत, सेमी इंग्रजी माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिले जाणारे शिक्षण आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ही शाळा पातूर तालुक्यातील एकमेव आदर्श दर्जा प्राप्त शाळा असून, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात प्रथम क्रमांक, तसेच SQAAF मूल्यांकनात A+ दर्जा मिळवला आहे. दरवर्षी एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे यशही उल्लेखनीय ठरत आहे.

या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिनारायणसिंह परिहार, गटविकास अधिकारी सतीश नायसे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, साने गुरुजी मंडळाच्या कला पथकाने स्वच्छतेबाबत जनजागृतीपर लोककला सादर केली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळा व गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या भेटीमुळे दिग्रस बु. येथील विकासकामांना अधिक चालना मिळणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top