Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर

Iftar Party :हुसेनिया मस्जिदीत इफ्तार पार्टी; आमदार मनोज कायंदे यांच्यासोबत ऐक्याचा संदेश

Iftar Party :पवित्र रमजान महिन्यानिमित्त मलकापूर पांगरा येथील हुसेनिया मस्जिदीत आमदार मनोज कायंदे यांनी रोजेदारांसोबत इफ्तार पार्टीत सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

Iftar Party

रमजानमध्ये सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश; मलकापूर पांगऱ्यात इफ्तारला मोठी उपस्थिती

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : पवित्र रमजान महिन्यानिमित्त मलकापूर पांगरा येथील हुसेनिया मस्जिदीत आमदार मनोज कायंदे यांनी रोजेदारांसोबत इफ्तार पार्टीत सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

सरकारी दर जाहीर होताच मलकापूर पांगऱ्यात लिलावात गदारोळ; प्रक्रिया रद्द

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून या काळात मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने रोजा (उपवास) पाळतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करून सायंकाळी इफ्तारद्वारे रोजा सोडला जातो. त्यामुळे इफ्तारला धार्मिक तसेच सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी गावातील भगवान कायंदे व हनीफ बागवान यांच्या पुढाकारातून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले.
इफ्तार पार्टीदरम्यान आमदार मनोज कायंदे यांनी पारंपरिक टोपी परिधान करून मुस्लिम बांधवांसमवेत बसून इफ्तार केला. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर तसेच अनेक हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला.
यावेळी बोलताना आमदार कायंदे यांनी, “ईद हा सण राष्ट्रीय एकात्मता व बंधुत्वाची शिकवण देणारा आहे. प्रत्येकाने आपल्या सण-उत्सवांमधून एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपला पाहिजे,” असे सांगत रमजान व आगामी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास गुलशेर खासाब, लुकमान शेरयार खान, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, मुजीब आलम, अकिल ठेकेदार, अयुब बाबा, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेमुदयार खान, हनान शेख, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, गजेंद्र देशमुख, भगवान गावंडे, सोपान केदार, बडी उगले, अमोल देशमुख, रामेश्वर दानवे, डॉ. आघाव, रामेश्वर सोनूने, नारायण गीते, पत्रकार भगवान साळवे, वसीम शेख, पवन मगर यांच्यासह मोठ्या संख्येने रोजेदार मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top