Mahabreaking

🔴 BREAKING
first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Avinash Shinde Takes the Lead :किनगाव जट्टू-बिबी सर्कलमध्ये राजकीय रणधुमाळी; अविनाश शिंदे आघाडीवर!

Avinash Shinde Takes the Lead :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी किनगाव जट्टू-बिबी सर्कलमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, शिंदेसेनेकडून अविनाश प्रकाशराव शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Avinash Shinde Takes the Lead

निवडणुका लांबल्या, तयारी मात्र जोरात; शिंदेसेनेकडून अविनाश शिंदे ‘फ्रंट रनर’

भागवत चव्हाण
कारेगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी किनगाव जट्टू-बिबी सर्कलमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, शिंदेसेनेकडून अविनाश प्रकाशराव शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Avinash Shinde Takes the Lead
लोणार तालुक्यातील मातमळ येथील अविनाश शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत पायाभरणी केली आहे. ‘शिवगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी उभारलेले जाळे आणि गावागावातील सक्रिय संपर्क यामुळे त्यांच्या दावेदारीला बळ मिळत आहे. राज्यभर विस्तारलेल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांशी संपर्क असल्याने निवडणुकीत त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच शिवसेना पक्षातही ते सक्रीय असून पक्षाचे काम करीत आहेत. त्यामुळे, त्यांचा कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे.

राजकीय पार्श्वभूमीही शिंदे यांच्या बाजूने असल्याचे दिसून येते. त्यांचे वडील प्रकाशराव शिंदे हे गेल्या चार दशकांपासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असून प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा ठेवत त्यांनी ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी मोठे योगदान दिले आहे. याच जनसंपर्काचा लाभ आता अविनाश शिंदे यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Avinash Shinde Takes the Lead!
स्थानिक स्तरावरही अविनाश शिंदे यांनी “सुखदुःखात धावून जाणारे कार्यकर्ते” अशी प्रतिमा निर्माण केली आहे. वैद्यकीय मदत, क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जनाधार तयार केला आहे. त्यामुळे सर्कलमध्ये त्यांची पकड वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव असल्याने दुर्गाताई अविनाश शिंदे यांचीदेखील तयारी सुरू आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातून दोन आघाड्यांवर निवडणूक लढवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
“पक्षाने संधी दिल्यास ती संधी सोने करून दाखवू,” असा विश्वास अविनाश शिंदे यांनी व्यक्त केला असून, जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती—दोन्ही निवडणुकांसाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे किनगाव जट्टू-बिबी सर्कलमध्ये आगामी निवडणुकीत शिंदे यांची दावेदारी कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Avinash Shinde Takes the Lead!

कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता माझे वडील प्रकाशराव शिंदे यांनी पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणातून समाजकारण करण्यासाठी निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचे सोने करून दाखवू. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पक्षातील वरिष्ठ नेतेही तिकीट देण्यास इच्छुक आहेत. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, यापैकी कोणतीही निवडणुक लढवण्यासाठी मी सज्ज आहे. ‘शिवगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या  व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनसंपर्क व सामाजिक कार्य केल्यामुळे या निवडणुकीत विजय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
— अविनाश प्रकाशराव शिंदे, संस्थापक अध्यक्ष, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top