Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Eid-ul-Fitr Prayers :बाळापूरमध्ये नवा इतिहास; प्रथमच नव्या ईदगाहवर ईद-उल-फितरची नमाज

Eid-ul-Fitr Prayers :ईद-उल-फितरच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, यंदा प्रथमच नव्या ईदगाहवर नमाज अदा करण्याची ऐतिहासिक तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने ११ मार्च रोजी २०व्या तरावीहच्या निमित्ताने शहरातील एका मशिदीत मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Eid-ul-Fitr Prayers

ईदसाठी दुहेरी तयारी; बाळापूरमध्ये दोन ठिकाणी नमाजची व्यवस्था

जाकीर अहमद

बाळापूर : ईद-उल-फितरच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, यंदा प्रथमच नव्या ईदगाहवर नमाज अदा करण्याची ऐतिहासिक तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने ११ मार्च रोजी २०व्या तरावीहच्या निमित्ताने शहरातील एका मशिदीत मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत नव्या ईदगाह परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग, सावली आदी सुविधांची सुयोग्य व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. नमाज्यांच्या सोयीसाठी विविध जबाबदाऱ्या समाजसेवक व गटांना सोपवण्यात आल्या आहेत.

बैठकीत ईदची नमाज सकाळी ८:५० वाजता अदा करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले असून, ही माहिती शहरातील सर्व मशिदींमार्फत प्रसारित करण्यात आली आहे. तसेच, वाढती गर्दी लक्षात घेता पर्यायी ठिकाणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

नव्या ईदगाह समितीच्या वतीने सुन्नतप्रमाणे खुल्या ठिकाणी नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ईदची नमाज ईदगाह किंवा शहराबाहेरील मैदानात अदा करणे अधिक अफजल मानले जाते, असे स्पष्ट करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकता व बंधुत्वाचा संदेश दृढ करावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, यंदा लखनवाडा, छोटी पालसी आणि जुना शेगाव मार्गाजवळील एका फार्महाऊसमध्येही प्रथमच नमाज अदा केली जाणार आहे. त्यामुळे शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नमाज अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमाला मुफ्ती मोहम्मद हनीफ कासमी, मौलाना बरकतुल्ला खान, मुफ्ती मुशीर, मौलाना रियाजुद्दीन आणि हाफिज मोहम्मद रिजवान यांसह शहरातील प्रमुख उलेमा व इमाम यांचा पाठिंबा लाभला आहे.

अकोला शहराच्या धर्तीवर बाळापूरमध्येही नमाज्यांच्या सोयीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, ईदच्या निमित्ताने शिस्त, सुविधा आणि सुन्नत पालन यांचा संगम साधण्याचा हा उपक्रम ठरणार आहे. या उपक्रमाला समाजातील विविध संघटना व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top