Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Thief :सोन्याची पोत लंपास करणाऱ्यास दोन तासातच केले गजाआड

Thief :किनगावराजा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सोन्याची पोत चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत जेरबंद केले असून, सलग तीन चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

Thief

किनगाव राजा पोलिसांची धडक कारवाई;  सलग तीन चोरीचे गुन्हे उघड

दुसरबीड : किनगावराजा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सोन्याची पोत चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत जेरबंद केले असून, सलग तीन चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उदय एकनाथ काकडे (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ८१/२६ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी देवानंद शंकर डोईफोडे (रा. केशव शिवणी) व विलास भाऊलाल दुनडियार (रा. दुसरबीड) यांना अटक केली. चौकशीत सौरभ अभिजीत देशमुख याचाही सहभाग उघड झाला. पुढील तपासात मंगेश कुंडलिक अवचार (वय २२, रा. दुसरबीड) याचाही सहभाग स्पष्ट झाला.

दरम्यान, १७ मार्च २०२६ रोजी गजानन भगवान ताठे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे १.५० लाख रुपयांची सोन्याची पोत चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दत्ता प्रकाश बिथ्रे (वय ३८, रा. दुसरबीड) याला गंधारी परिसरातून पोलिसांनी सापळा रचून अटक केली.कसून चौकशीत आरोपींनी आणखी एक धक्कादायक गुन्हा कबूल केला. शेख अबरार शेख जब्बार (रा. दुसरबीड) यांच्या शेतातून सहा शेळ्या व दोन बोकड, अंदाजे ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची कबुली आरोपींनी दिली.

या सर्व प्रकरणांचा सखोल तपास पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू मुंडे करत आहेत. तसेच अटकेची कारवाई पोलीस कर्मचारी जीवन जायभाये, राज शहा, विजेता पवार, ज्ञानेश्वर दहातोंडे व मिलिंद सोनपसारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी चार आरोपींना बुलढाणा येथील कारागृहात पाठविण्यात आले असून, मुख्य आरोपी दत्ता बिथ्रे याला पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.पोलिसांच्या या झंझावाती कारवाईमुळे चोरट्यांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून, परिसरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top