Mahabreaking

[breaking_news]

Loot Worth Lakhs at Knifepoint :बायगांव बु.मध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; चाकूच्या धाकावर लाखोंची लूट 

Loot Worth Lakhs at Knifepoint :अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बायगांव बु. येथे मध्यरात्री चार अज्ञात दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घालत चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी दरोडा टाकत लाखो रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. या धाडसी घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Loot Worth Lakhs at Knifepoint
अंढेरा : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बायगांव बु. येथे मध्यरात्री चार अज्ञात दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घालत चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी दरोडा टाकत लाखो रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. या धाडसी घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
17 मार्चच्या मध्यरात्री शेतात कुटुंबासह वास्तव्यास असलेले शेतकरी भगवान विष्णु खरात हे झोपेत असताना चार मुखवटा बांधलेले दरोडेखोर त्यांच्या जवळ पोहोचले. गळ्याला चाकू लावून घर उघडण्यास भाग पाडत त्यांनी घरात घुसखोरी केली. यानंतर खरात यांच्या पत्नीच्या अंगावरील एकदाणी, मंगळसूत्र, मणी पोत, कानातील फुले तसेच कपाटातील सुमारे २१ हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. याच टोळीने काही वेळातच दुसरा डाव साधत शिवनारायण भगवान ताकतोडे यांच्या शेतातील गव्हाच्या खळ्यावर धडक दिली. येथेही चाकूचा धाक दाखवत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील दागिने हिसकावून नेले. दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. दरम्यान, पळ काढताना एका आरोपीचा तोल जाऊन तो खाली पडल्याने सतर्क नागरिकांनी त्याला पकडून अंढेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बायगांव बु.सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top